Thursday, April 19, 2012

Kolkata dairy -1

कुठल्याही शहराची पहिली ओळख तिथे आपले "आगमन" कसे होते त्यावर अवलंबून असते. "first impression " बद्दल जगात  खूप  काही  बोललं जातं  ते  उगाच  नव्हे.कलकत्त्याच्या "नेताजी सुभाष चंद्र बोस " airport  वर  आम्ही  उतरलो  खरा ...पण  आकाशातून  पडून  धाडकन  जमिनीवर  आदळलो  ते मात्र डासांमुळे .....डास  डास  आणि  फक्त  डास  .तिथे  west bengol goverment व्यतिरिक्त  फक्त  डासंचेच  साम्राज्य  होते .इतके  डास  मी  आजपर्यंत  कधीच  पहिले  नाही . एक क्षण सुद्धा  "न  हलता"  आपण  उभे  राहू  शकत  नाही ..दोन्ही  हातानी  फक्त  डास  मारायचंच  काम  करावा  लागत  होतं  ..तेसुद्धा  taxi   आपल्याजवळ  येईपर्यंत ...दोन्ही   पाय  जागच्या  जागी  नाचावावे  लागत  होते ...horrible it was. तरीसुद्धा  डास  चावालेच .....taxi  मध्ये  बसलो  तर  taxi  च्या  आत  मध्ये  पण  डास ....गाडी  सुरु  झाली  तरी  पण  डासांपासून  सुटका  होत  नव्हती ....जरा  दूर  आल्यावर  गेले  डास ...कलकत्त्याला  येताना  सगळे  जण  please odomas घेउन   या ...उतरायच्या  आधी  विमानातच  लावा  म्हणजे  तुमचा  रक्षण  होईल ...असो .


कलकत्त्याची life  line  "Taxi " म्हणजे  technology  ला  आव्हान  आहे ..कोणी कितीही talented  lastest design काढले  तरी  पुण्याच्या   "टमटम " ला   आणि  कोलकात्याच्या  taxi ला तोड नाही . दार  नक्की  लागला  असेल  कि  नाही  असा  विचार  करेपर्यंतच  आमचे  घर  आले  म्हणून  वाचले .कधीही  तुटू  शकेल  अशी  दारं  taxi ला  लावली  आहे  असं  वाटते . अगदी  खिळखिळी  झालेल्या  गाडीत  आपण बसायचे आणि ती मात्र भरधाव वेगाने धावणार...तोंडात फक्त रामाचे नाव घ्यायचे .....खाली रस्त्यावर taxi येत असली कि तिचा खुळखुळा चा आवाजच अगोदर  येतो. ..पण  आश्चर्य  म्हणजे  ह्या  taxi ला  काहीच  होत  नाही ..बिनधास्त  पणे  रस्त्यावर  धावत  असते  ..आणि अश्या  असंख्य  taxya ...त्यांचा रूप म्हणजे जाडजूड पिवळा डबा  "ambessador "...काही काही पांढर्या taxi  पण आहेत..पण दोघांमधला difference  मला अजून नाही माहित   ......"मीटर  च्या  दुप्पट  + 2 रुपये  extra " असं  भाड्याचं  calculation आहे .....driver मीटर  टाकतात  हेच  का  थोडे  आहे ......

इथला आणखीन  एक  challenging item म्हणजे  "सायकल  रिक्षा"........काय  तिचं  ते  रूप  आणि  काय ते  चालवणारी माणसे  .जिथे  मेट्रो  ने  एवढे  शहर  cover केले  आहे  तिथे  हि  सायकल  रिक्षा  एवढी  चालते ..किती  हा  विरोधाभास ..इंडिया  आणि  भारत .......बसायला  जागा  म्हणजे  "दीड  माणूस"  बसेल  इतकी ..सीट पूर्णपणे  horizontal नाही ,जरा  पुढे  कललेले ..म्हणजे  आपण  बसलो  कि  सारखं  वाटत  राहत   आपण  घसरून  पुढे  पडूनच  जाऊ ..मागे  टेकायला  पण   काहीच  नाही ..तुमचा  balance तुम्ही  किती  "skillfully" करता  ह्यावरच  सगळं  depend असतं  ...चढायला  सोपं  आहे  पण  उतरायला  ..."कठीण  कठीण  कठीण  किती "...मला  तर  आधी  कळतच  नव्हते  कसे  उतरायचे ....चांगलं लागलंच  माझ्या पायाला ......पण  आता  शिकले ...आपण  लहान  मुल  असताना  भिंत  कशी  उतरायचो ..तसं  उतरणं  सोपं  असतं ...साडी  नेसून  ह्या  बायका  कशा  चढतात उतरतात  देव  जाणे  .....मी  आणि  आदित्य  एकदम  नीट  बसतो ..पण  हातातली  purse   आणि  एखादी  bag   असेल  तर  अवस्था  वाईट  होते . मी  आदित्य  आणि   अमित  म्हणजे  "बसून  दाखवा " competition असते ...नवीन  नवीन  एक  दोनदा  आम्ही  असं  try मारला .....आता  एक  तर  दोन  रिक्षा  करू  किंवा  गाडीच  नेऊ ...जवळची  अंतर  taxi येत   नाही  ..मग सायकल  रिक्षाला  पर्याय  नसतो .thats  how they make business.                  


                                                                                                                ...................Continue







No comments:

Post a Comment